फलटण येथे धारदार सुऱ्याने पतीचा मर्डर तर पत्नीचा हाफ मर्डर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ ऑगस्ट - सोमवार पेठ फलटण येथे, चोरी केलेल्या मोटारी विक्री करून आलेल्या पैशांची वाटणी बरोबर न केल्याने चिडून जाऊन, धारदार सुऱ्याने छातीत व डोक्यात वार करून राचुऱ्या काळे याचा खून केला तर त्याची पत्नी रोशनी काळे हिच्या डोक्यात वार करून तिला गंभीर जखमी केल्याप्रकरणी पप्या उर्फ शूरवीर पवार व अनोळखी एक महिला व एक पुरुष यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ८ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास सोमवार पेठ फलटण येथे 1) राचुऱ्या एकनाथ काळे वय अंदाजे 29 वर्षे त्याची पत्नी 2) रोशनी राचुऱ्या काळे वय अंदाजे 23 वर्ष दोघे सध्या रा बरड ता. फलटण जि. सातारा 3) पप्या उर्फ शुरवीर पवार (पूर्ण नाव गाव माहित नाही) असे तिघेजण पत्र्याच्या शेडमध्ये आले. त्यांनी सोमनाथ माणिक मोहिते यांच्याकडून घेवून गेलेले जेवण केले. सोमनाथ माणिक मोहिते यांनी घराचे टेरेसवरून खाली येवून सुमारे 10 से 15 फूट अंतरावरून पाहिले असता, चोरी केलेल्या मोटारी विक्री करून त्यातून आलेल्या पैश्याची वाटणी करीत असताना, पप्या याला कमी पैसे दिले म्हणून, पप्या हा जोरजोरात म्हणत होता, माझा हिशोब मला बराबर दिला नाही, तुम्हाला आता जिवंत सोडणार नाही, असे म्हणून कमरेस पाठीमागे ठेवलेल्या, दोन्ही बाजूस धार असलेल्या लोखंडी पात्याच्या सुऱ्याने, रोशनी राचुऱ्या काळे हिच्या डोक्यात सुऱ्याने वार करून, तिला गंभीर जखमी केले. त्यामुळे राचुऱ्या चिडून पप्याच्या अंगावर गेला, त्याचवेळी पप्याने हातातील सऱ्याने रचुऱ्या याच्या छातीवर व डोक्यात गंभीर वार करून, त्याचा खून केला असल्याची फिर्याद सोमनाथ मोहिते यांनी दिली आहे.
1) पप्या उर्फ शुरवीर पवार (पुर्ण नाव गाव माहित नाही) 2) अनोळखी एक महिला व पुरुष - यांच्या विरुध्द फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये खून, जीवे मारण्याचा प्रयत्न असा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि. गायकवाड हे करित आहेत.

No comments