Breaking News

श्री विठ्ठलास सोन्याची राखी भेट

Gold Rakhi gift to Shri Vitthal

    पंढरपूर दि. २२ (प्रतिनिधी) - आज रविवार दि. २२/०८/२०२१ श्रावण शु १५ राखी पोर्णीमा निमीत्त श्री ज्ञानेश्वर रोहीदास भुरूक व श्री विक्रम रोहीदास भुरूक रा. धायरी, जि. पुणे यांनी त्यांचे आईचे नावे इंदुबाई रोहीदास भुरूक यांचे इच्छेनुसार त्यांनी आज श्री विठ्ठलास दोन तोळे सोन्याची राखी अंदाजीत रक्कम रु १,१०,०००/- अक्षरी एक लाख दहा हजार रूपये ची भेट स्वरूपात दिली.

    त्यावेळी श्री विक्रम रोहीदास भुरूक यांचा सत्कार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्री च उपरण व दैनंदिनी देऊन करण्यात आला. त्यावेळी श्री ज्ञानेश्वर रोहीदास भुरूक व मंदिर समिती कर्मचारी उपस्थित होते.

No comments