Breaking News

नंदकुमार भोईटे अनंतात विलीन ; शोकाकुल वातावरणात 'शेठ' ला अखेरचा निरोप

नंदकुमार भोईटे यांच्या पार्थिवास अग्नी देताना त्यांचे पुतणे
Funeral on Nandkumar Bhoite at phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २९ ऑगस्ट :- फलटण नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान उपनगराध्यक्ष नंदकुमार आबाजी भोईटे आज दि. २९ रोजी अनंतात विलीन झाले. फलटण या त्यांच्या कर्मभूमीत सकाळी नऊ वाजणेच्या सुमारास सजाई गार्डन येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  नंदकुमार भोईटे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण फलटण तालूक्यातून जनसागर लोटला होता. मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी शोकाकुल वातावरणात साश्रूपूर्ण नयनांनी नंदकुमार भोईटे यांना अखेरचा निरोप दिला. सर्वसामान्यांचे लाडके 'शेठ' अनंतात विलीन झाले.

    शुक्रवारी दि. २७ रोजी नंदकुमार भोईटे यांचे लेह- लडाख येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष, प्रसिद्ध उद्योजक नंदकुमार भोईटे यांच्या निधनाचे वृत्त कळताच फलटण तालुका शोकसागरात बुडाला. शहरातील व्यवहार बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. शनिवारी दि 28 रोजी रात्री उशिरा त्यांचे पार्थीव फलटण येथे राहत्या घरी आणण्यात आले. 

    फलटण येथील राहत्या घरी त्यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते, त्यांनतर रविवारी सकाळी 8 वाजता डी. एड. चौक येथील राहत्या घरापासून शहरातील प्रमुख मार्गावरून डेक्कन चौक मार्गे त्यांचे पार्थीव सजाई गार्डन येथे आणण्यात आले. यानंतर 9 वाजता सजाई गार्डन येथील मागील बाजूस पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,अनिल देसाई, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर,  सुभाष शिंदे, दिगंबर आगवणे, अशोकराव जाधव, सचिन सूर्यवंशी (बेडके), तेजसिंह भोसले,  जयकुमार शिंदे, सुशांत निंबाळकर, नानासाहेब पवार , दादासाहेब चोरमले यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते यासह  सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments