Breaking News

स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील हस्ते ध्वजारोहण ; सातारा जिल्हा राज्यातील एक अग्रेसर जिल्हा घडवावा यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे केले आवाहन

Flag hoisting by Guardian Minister Balasaheb Patil on Independence Day

    सातारा दि.15 (जिमाका):    विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे.   सर्वांनी एकदिलाने काम करुन सातारा जिल्हा राज्यातील एक अग्रेसर जिल्हा घडवावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

    भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते.  ध्वजवंदनानंतर पालकमंत्र्यांनी पोलीस दलाची मानवंदना स्विकारुन उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी  उपस्थित होते.

    अतिवृष्टीमुळे  जीवीतहानी झालेल्यांच्या  नातेवाईकांना तातडीने 5 लाखाची मदत करण्यात आली असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, मृत व्यक्तींमध्ये जे शेतकरी आहेत त्यांना स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ देण्याच्या सूचना कृषी विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

    अतिवृष्टीमुळे विद्युत पोल वाहून व पडले होते. विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आहोरात्र काम करुन विद्युत पुरवठा सुरळीत केला आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या  2021-22 या वर्षासाठी एकूण 375 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीत आहे. यामधून कोविड उपाययोजनांसाठी 30 टक्के निधी रुपये 98 कोटी 3 लाख 2 हजार तसेच जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या उपाययोजनांसाठी 5 टक्के निधी रुपये 16 कोटी 72 लाख 50 हजार इतका निधी पुनर्विनियोजित करण्यात आला असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

    तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एकही बालक उपचारापासून वंचित राहणार नाही याची जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. येथील स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना बाधित लहान मुलांसाठी बाल कोविड अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आला आहे. या अतिदक्षता विभागात 19 आयसीयु बेड व 8 ऑक्सिजन बेडची निर्मिती करण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील यांनी जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या  शुभेच्छा दिल्या.

No comments