फलटण तालुक्यात कोळकी, जाधववाडीसह 29 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० ऑगस्ट - फलटण तालुक्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, फलटणचे प्रांताधिकारी तथा इन्सिडेंट ऑफिसर शिवाजीराव जगताप यांनी फलटण तालुक्यातील २9 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित केलेली आहेत.
कोळकी गावातील वनदेव शेरी, सावतामाळी नगर, चिंतामणी पार्क, त्रिमूर्ती अपार्टमेंट, व्यंकटेश अपार्टमेंट, चैतन्य अपार्टमेंट, शारदा नगर हा भाग कंटेनमेंट घेऊन जाहीर करण्यात आला आहे. दुधेबावी गावातील काळे मळा चौंडी ते गावठाण दुधेबावी रोड या भागात कंटेनमेंट घेऊन जाहीर केला आहे.
खालील गावांमध्ये पूर्ण गावात कंटेनमेंट घेऊन जाहीर केला आहे.
तरडगाव, कुरवली बुद्रुक, निंबळक, बरड, गिरवी, पाडेगाव, शिंदे माळ, जाधववाडी, हिंगणगाव, साखरवाडी, राजुरी, पिंपरद, कांबळेश्वर, दुधेबावी, राजाळे, सुरवडी, वडले, मुंजवडी, आदर्की बुद्रुक, वाखरी, सस्तेवाडी, चौधरवाडी, सरडे, खामगाव, फडतरवाडी, मठाचीवाडी, खडकी या गावात संपूर्ण गावांमध्ये कंटेनमेंट जाहीर करण्यात आला आहे.
दि. ९ ऑगस्ट २०२१ ते २२ ऑगस्ट २०२१ पर्यत वरील सर्व गावे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेली आहेत. या गावांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच कटेंटमेंट झोन प्रमाणे नियम लागू राहणार आहेत. आरोग्य विषयक सेवा सोडून सर्व सेवा बंद राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी स्पष्ट केले.

No comments