Breaking News

फलटण तालुक्यात 139 कोरोना बाधित ; सर्वाधिक शहर 22, जाधववाडी 10, कोळकी 8

139 corona affected in Phaltan taluka; highest in city

    फलटण दि. 31 ऑगस्ट 2021  (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल  दि. 30 ऑगस्ट 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 139 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 22 रुग्ण तर ग्रामीण भागात 117 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक नांदल येथे 12 रुग्ण  त्या खालोखाल जाधववाडी, तांबवे, राजुरी  येथे प्रत्येकी 10  रुग्ण सापडले आहेत.    

    काल  दि. 30 ऑगस्ट  2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 139 बाधित आहेत. 139 बाधित चाचण्यांमध्ये 37 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 102 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 22 तर ग्रामीण भागात 117 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात नांदल 12,   जाधववाडी 10, तांबवे 10, राजुरी 10, कोळकी 8,  धुमाळवाडी 1, घाडगेमळा 1, बरड 4, काळज 1, मठाचीवाडी 1, माळेवाडी 1, मुंजवडी 1, बिबी 1, मिरढे 1, मिरेवाडी 1, मिरगाव 1, पिंपरद 1, शिंदेनगर 1, विडणी 4, गिरवी 3, फरांडवाडी 2,  शेरेचीवाडी 1, साठे 1, सासवड 1, सोमंथळी 3, सोनवडी खुर्द 2, सस्तेवाडी 1, सुरवडी 2, वाठार निंबाळकर 4, चौधरवाडी 3, तरडगाव 1,  तरडफ 1,  टाकळवाडा 3, गोखळी 1, गुणवरे 1, बिजवडी तालुका माण 2,  परिंचे तालुका पुरंदर 1, पेठ नाका सांगली 1, घाडगेवाडी 1, हिंगणगाव 1,  शेरेवाडी 3, सांगवी 1,  डोंबाळवाडी 1, वाखरी 1, वडले 3, येळेवाडी तालुका माण 1,  कोराळे बुद्रुक तालुका बारामती 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

1 comment:

  1. Prant chi aadhi badali karawi, nuste lockdown lockdown karun kaay fayda zala??

    ReplyDelete