फलटण तालुक्यात 108 कोरोना बाधित ; सर्वाधिक जाधववाडी 12
फलटण दि. 28 ऑगस्ट 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 27 ऑगस्ट 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 108 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 14 रुग्ण तर ग्रामीण भागात 94 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक जाधववाडी येथे 12 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 27 ऑगस्ट 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 108 बाधित आहेत. 108 बाधित चाचण्यांमध्ये 22 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 86 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 14 तर ग्रामीण भागात 94 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात जाधववाडी 12, ढवळेवाडी 1, कोळकी 6, मुळीकवाडी 2, मलवडी 5, निंभोरे 1, पाडेगाव 3, राजुरी 3, साखरवाडी 1, सांगवी 3, आदर्की 1, गुणवरे 6, धुमाळवाडी 5, घाडगेवाडी 4, खुंटे 1, ढवळ 1, ठाकूरकी 1, बरड 3, कांबळेश्वर 1, कुरवली बुद्रुक 5, मठाचीवाडी 1, मांडवखडक 1, शिंदेवाडी 1, विडणी 1, जिंती 1, निंबळक 1, निरगुडी 1, गिरवी 2, भाडळी खुर्द 2, फरांदवाडी 1, फडतरवाडी 1, सासवड 1, सोनगाव 2, दालवडी 2, जोरगाव (वाखरी) 1, वडले 3, चौधरवाडी 1, तडवळे 1, गोखळी 1, बारामती 1, पाचवड 1, पुणे 1, लाटे तालुका बारामती 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments