तरडगाव येथे माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पूजन
![]() |
तरडगाव येथे माऊलींच्या पादुकांचे पूजन करताना ग्रामस्थ (छाया - संजय किकले) |
तरडगाव : (संजय किकले)- माऊलींच्या पालखी सोहळ्याचा विरह मनामनात असून, आज माऊलींच्या पालखी सोहळ्याचे उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे होऊन, पालखी सोहळा मुक्कामी तरडगाव येथे असता, परंतु कोरोना पार्श्वभूमीवर सोहळा रद्दा केल्याने हे होऊ शकले नाही. जरी पालखी सोहळा रद्द करण्यात आला असला, तरी तरडगावच्या गावकऱ्यांनी मात्र प्रतीकात्मक पालखी सोहळ्याचे आगमन व प्रस्थान करून, माऊलींच्या पादुकांचे विधिवत पूजन केले.
तरडगाव येथे प्रतीकात्मक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. नंतर चांदोबाचा लिंब येथे विधीपूर्वक सर्व कार्यक्रम भजन, हरिपाठ, समाज आरती करून तरडगावकरांच्या ताब्यात माऊलींची पालखी दिल्याचे दाखवून, माऊलींच्या पादुका गावातील सर्व भजनी मंडळी समवेत पालखी सोहळा तळावर नेण्यात आला. अभंग म्हणत विधीवत तरडगाव ग्रामपंचायत सरपंच,मान्यावर व ग्रामस्थांच्या वतीने अभिषेक पुजा हरीपाठ समाज आरती करण्यात आली, नंतर श्री मंदार संजय किकले यांच्यावतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले.
No comments