Breaking News

टोकीयो ऑलिम्पिक - २०२० : राज्यातील निवड झालेल्या खेळाडूंना क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दिल्या शुभेच्छा

Tokyo Olympics - 2020: Sports Minister Sunil Kedar wishes the selected athletes in the state

    मुंबई - : टोकीयो ऑलिम्पिक – २०२० साठी राज्यातील निवड झालेल्या ८ खेळाडूंनी आप-आपल्या खेळामध्ये विक्रमांची उंच शिखरे गाठावीत, राज्य आणि देशासह माता-पित्यांचे नाव मोठे करावे, अशा शुभेच्छा क्रीडा व युवक कल्याण  मंत्री सुनील केदार यांनी दिल्या.

    टोकीयो ऑलिम्पिक -२०२० चे आयोजन २३ जुलै ते ५ सप्टेंबर २०२१ दरम्यान करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील ८ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या सर्व खेळाडूंना शासन आर्थिक मदतीसह सर्वतोपरी सहकार्य करीत आहे. राज्यशासन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वेळोवेळी आवश्यक ती मदत करीत असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.

निवड झालेल्या खेळाडूंची वैयक्तिक माहिती

१) राही जीवन सरनोबत – कोल्हापूर, खेळ-शुटींग-२५ मीटर पिस्तूल, महाराष्ट्र शासनात थेट नियुक्तीद्वारे उपजिल्हाधिकारीपदी नेमणूक, महाराष्ट्र शासनाच्या अनिवासी क्रीडा प्रबोधिनीची माजी खेळाडू.

२) श्रीमती तेजस्वीनी सावंत – कोल्हापूर, खेळ शुटींग-५० मीटर, थ्री रायफल पोजिशन, शासनाच्या क्रीडा विभागात थेट नियुक्तीद्वारे विशेष कार्यकारी अधिकारी (उपसंचालक दर्जा) पदी नेमणूक, महाराष्ट्र शासनाच्या अनिवासी क्रीडा प्रबोधिनीची माजी खेळाडू

३) श्री.अविनाश मुकुंद साबळे - बीड. खेळ- अॅथलेटिक्स ३००० मीटर स्टिपलचेस, सेनादल मध्ये नायब सुभेदार पदी कार्यरत, महाराष्ट्र शासनाच्या निवासी क्रीडा प्रबोधिनीची माजी खेळाडू.

४) श्री.प्रविण रमेश जाधव - सातारा, खेळ- आर्चरी- रिकर्व्ह, सेनादल मध्ये नायब सुभेदारपदी कार्यरत, महाराष्ट्र शासनाच्या निवासी क्रीडा प्रबोधिनीची माजी खेळाडू.

५) श्री.चिराग चंद्रशेखर शेट्टी -  मुंबई, खेळ बॅडमिंटन पुरुष दुहेरी “अ” श्रेणी अधिकारी, इंडियन ऑईल

६) श्री.विष्णू सरवानन, मुंबई, खेळ -सेलिंग- लेजर स्टँडर्ड क्लास, सेनादलात नायब सुभेदारपदी कार्यरत

पॅराऑलिम्पिक पात्र खेळाडू

७) श्री.स्वरुप महावीर उन्हाळकर, कोल्हापूर, खेळ-पॅरा शुटिंग-१० मीटर रायफल

८) श्री.सुयश नारायण जाधव, सोलापूर खेळ-पॅरा स्विमर-५० मीटर बटर फ्लाय, २०० मीटर वैयक्तिक मिडले, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागात थेट नियुक्ती द्वारे “अ” श्रेणी क्रीडा मार्गदर्शक नियुक्ती.

No comments