Breaking News

मराठी पत्रकार परिषदेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव

प्रा.रमेश आढाव यांची फलटण तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी निवड झालेनंतर सत्कार करताना शरद काटकर, हरीश पाटणे, विनोद कुलकर्णी, दीपक प्रभावळकर, यशवंत खलाटे पाटील, युवराज पवार, विक्रम चोरमले, शक्ती भोसले

    Senior journalist Prof. Ramesh Adhav as Phaltan taluka president of Marathi Patrkar parishad

    फलटण (प्रतिनिधी) - मराठी पत्रकार परिषदेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जेष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव हे गेली 30 वर्षाहुन अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात काम करीत आहेत.  त्यांच्या सडेतोड पत्रकारितेच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळाला असून, सर्वांना बरोबर घेऊन सर्व पत्रकारांच्या सुख दुःखात नेहमीच सावलीसारखे उभे राहणारे जेष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव म्हणजे फलटण च्या पत्रकारिता क्षेत्रातील "वैभव" असून, पत्रकारिता क्षेत्रात  व सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना, कित्येक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

  फलटण येथील विश्रामगृहात सर्व पत्रकारांची बैठक पत्रकार दादासाहेब चोरमले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या मध्ये फलटण मध्ये  मराठी पत्रकार संघाची शाखा न्हवती, या मुळे ही शाखा स्थापन करण्यात यावी अशी सर्वांनी इच्छा व्यक्त केली, त्या अनुषंगाने महाराष्ट्रात जेष्ठ पत्रकार तथा सर्वांचे मार्गदर्शक व संस्थापक अध्यक्ष एस. एम. देशमुख, किरण नाईक व सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष  हरीश पाटणे यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेची स्थापना करण्यात आली, व त्या संस्थेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांची निवड करण्याचा ठराव एकमताने  करण्यात आला. त्यानंतर  प्रा.रमेश आढाव यांना फलटण तालुका अध्यक्ष पदी निवड करण्याचा ठराव,  सातारा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा अध्यक्ष हरीश पाटणे, जेष्ठ मार्गदर्शक शरद काटकर,विनोद कुलकर्णी, दीपक प्रभावळकर यांना समक्ष भेटून सातारा येथे देण्यात आले.

       यावेळी बोलताना हरीश पाटणे यांनी सांगितले की तुम्ही केलेली मागणी व त्याचा ठराव वरिष्ठ पदाधिकारी व मार्गदर्शक एस. एम.देशमुख यांना पाठवून देतो असे सांगून फलटण मधील सर्व पत्रकारांची एकजूट पाहून आनंद झाल्याचे पाटणे यांनी सांगितले, व या पुढे सर्व पत्रकारांच्या सुख दुःखात मी एक पाऊल तुमच्या पुढे असेन, असा शब्द दिला, व तुम्ही मागणी केल्याप्रमाणे प्रा.रमेश आढाव हे आजपासून फलटण तालुका अध्यक्षपदी काम करतील असे जाहीर केले व त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, यावेळी समाधान हेंद्रे, यशवंत खलाटे(पाटील), युवराज पवार,विक्रम चोरमले,व शक्ती भोसले उपस्थित होते.

No comments