Breaking News

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधू उपांत्य फेरीत

P. V. Sindhu in the semifinals at the Tokyo Olympics

    गंधवार्ता वृत्तसेवा दि. ३० जुलै -  भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकेन यामागुचीचा पराभव करत ऑलिंपिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व सामन्यात यामागुची सिंधूच्या आक्रमकतेपुढे ती टीकू शकली नाही. सिंधूने यामागुचीवर २१-१३, २२-२० असा सरळ विजय मिळवला.

    पहिल्या गेममध्ये सिंधूने ११-७ अशी आघाडी घेतली होती. आक्रमक आणि बचाव या दोन्हीमध्ये सिंधूने सुरेख समतोल साधत गेम २१-१३ असा जिंकला आणि सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. पहिल्या गेममधील विजया पाठोपाठ सिंधूने दुसऱ्या गेममध्ये ११-६ अशी आघाडी घेतली होती परंतु यानंतर यामागुचीने जोरदार पुनरागमन केले आणि सामन्यात १६ -१५ अशी आघाडी घेतली. त्यांनतर  दोन्ही खेळडूंमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. प्रथम १६-१६ अशी बरोबरी नंतर यामागुचीने २०-१८ अशी आघाडी घेतली होती. पण सिंधूने जबरदास्त खेळ करत २०-२० अशी बरोबरी केली. त्यानंतर सलग २ गुण मिळवत सिंधूने दुसरा गेम २२-२० असा जिंकला आणि टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.

No comments