फलटण शहरात दि. १० जुलै रोजी पाणी पुरवठा होणार नाही - मुख्याधिकारी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण शहरात उद्या दि. १० जुलै २०२१ रोजी पाणीपुरवठा केंद्रातील टॅंक स्वच्छतेमुळे शहरात पाणी पुरवठा होणार नसल्याचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी कळवले आहे.
फलटण शहरातील सर्व नागरिकांना कळविणेत येते की शनिवार दिनांक - १०/७/२०२१ रोजी सुधारित जलकेंद्र येथिल सेटलिग टॅंक (पाण्याच्या टाक्या) स्वच्छ करावयाच्या असल्याने शनिवार दिनांक - १० जुलै २१ रोजी पाणी पुरवठा होणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.
No comments