Breaking News

राष्ट्रीय लोकअदालतीचे 1 ऑगस्ट रोजी आयोजन

National Lok Adalati on 1st August

    सातारा दि. 27 (जिमाका) : रविवार दि.1 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हा न्यायालय, सातारा व तालुका स्तरावरील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

   सातारा जिल्हा न्यायालयात लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्याशधिश राजेंद्र सावंत यांच्या हस्ते होणार आहे. लोकअदालतीत भूसंपादन प्रकरणे, धनादेश न वटलेली प्रकरणे, फी संबंधी प्रकरणे, मोटार अपघात दावे, थकीत कर्जाची प्रकरण, वैवाहिक वाद, सर्व प्रकारचे दिवाणी दावे व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे इत्यादी सर्व प्रकरणांचा समावेश आहे. येत्या लोकअदालतीमध्ये न्यायाधीश, सरकारी वकील इत्यादी तडजोड घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणार आहेत. तरी सर्व पक्षकारांनी जास्तीत जास्त संख्येने न्यायालयात सकाळी 10.15 वा. उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्रीमती तृप्ती जाधव आणि जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲङ अरुण खोत यांनी केले आहे.

   महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने सामा  या संस्थेची ई-लोकअदालत व त्यासाठी आवश्यक सर्व ई-सुविधा पुरवठयाकामी व्यवस्था करण्यात आली आहे. कोविडसदृश्य पार्श्वभूमीवर पक्षकारांना सदरहू लोकन्यायालयामध्ये व्यक्तिश: उपस्थित राहता येणार नाही. तथापि या लोकन्यायालयामध्ये सहभागी होवून यशस्वी तडजोड करण्याची इच्छा असेल अशा पक्षकारांसाठी आभासी पध्दतीने सहभाग घेण्यासाठी ई-सुविधेचा उपयोग केला जाणार आहे. आभासी पध्दतीने ऑनलाईनद्वारे सहभागासाठी संबंधित पक्षकारांकडे मोबाईल असणे आवश्यक आहे. कोविड कार्यकाळामध्ये सर्वतोपरी शासकीय नियम व आदेशांचा पालन करुन आयोजित केलेल्या या राष्ट्रीय लोकअदालतीध्ये आपण प्रत्यक्ष अथवा आभासी पध्दतीने सहभागी होवून या लोकअदालतीचा लाभ विधीज्ञ व पक्षकार यांनी घ्यावा.

     कोविडच्या या विपरीत काळात लोकांच्या मानसिकरित्या, आर्थिकदृष्ट्या इत्यादी अमुलाग्र बदल होवून अपापसात मतभेद असलेल्या लोकांनी एकमेकांस मदत केली आहे, याही लोकांचे वाद खटले प्रलंबित असतील तर त्यांनी बदलत्या मानसिकतेस अनुसरुन एकमेकांस मदत करत नियोजित लोकन्यायालयात आपापसातील मतभेद विसरुन तडजोडीने खटले मिटवून सौहार्दपुर्ण संबंध प्रस्थापित करावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्रीमती तृप्ती जाधव यांनी केले आहे.

No comments