विवाहितेचा छळ ; सासरे - सासू - दीर - जाऊ यांच्यावर गुन्हा दाखल
फलटण ( गंधवार्ता वृत्तसेवा) - घरात फरशी बसवण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणावेत व पहिली मुलगी झाली या कारणावरुन विडणी येथे सासरच्या माणसांकडून विवाहितेचा छळ करण्यात आल्या प्रकरणी सासरे, सासू, दीर व जाऊ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २५/१२/२०१५ रोजीचे पंधरा दिवसानंतर ते दिनांक ३१/५/२०२१ रोजी पर्यंत विडणी ता. फलटण येथे १) दुर्योधन मरिबा जगताप (सासरे) २)विजया दुर्योधन जगताप (सासु) ३) लक्ष्मण दुर्योधन जगताप (दीर) ४) प्रतिज्ञा लक्ष्मण जगताप (जाऊ) सर्व रा.विडणी ता.फलटण जि. सातारा यांनी विवाहिता सोनाली किरण जगताप हिचा छळ केला आहे.
घरात फरशी बसवण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणावेत तसेच विवाहिता सोनाली हिस पहिली मुलगी झाली या कारणावरुन विवाहितेस वेळोवेळी उपाशीपोटी ठेवुन शारिरीक, मानसिक त्रास देवुन हाताने मारहाण करून हाकलुन दिले असल्याची फिर्याद सोनाली किरण जगताप हिने दिली आहे.
अधिक तपास महिला पोलीस नाईक एस आर कदम करीत आहेत.
No comments