Breaking News

कोरोना संख्येत वाढ ; फलटण तालुक्यात 108 कोरोना बाधित ; सर्वाधिक आळजापूर 14

Increase in the number of corona; 108 corona affected in Phaltan taluka; Most Aljapur 14

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 17 जुलै 2021  - काल दि. 16 जुलै 2021 रोजी  जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 108 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये शहरात 9  व्यक्ती तर ग्रामीण भागात 99 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक आळजापूर येथे 14 रुग्ण सापडले आहेत.  कोरोनाचा धोका वाढला असून ही बाब चिंताजनक आहे.  नागरिकांनी  सावधान झाले पाहिजे. आणि कंपल्सरी मास्कचा वापर  व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. 

    काल दि. 16 जुलै  2021 रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 108 बाधित आहेत. 108 बाधित चाचण्यांमध्ये 57 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 51 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 9 तर ग्रामीण भागात 99 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात खुंटे 1, खामगाव 2, बरड 1, काळज 1, कापडगाव 9, कुसूर 3, माळेवाडी 2, हिंगणगाव 1, विडणी , जिंती 3, निंबळक 2, निरगुडी 1, होळ 1, राजुरी 3, साखरवाडी 1, सांगवी 3, सोमंथळी 1, सालपे 1, दुधेबावी 1, तरडगाव 1, तडवळे 3, नाईकवोमवाडी 1, आळजापुर 14, आदर्की खु 4, गोखळी 1, जाईगाव ता खटाव 1, दहिवडी ता माण 1, खटकेवस्ती 1, ढवळ 1, ढवळेवाडी 1, कांबळेश्वर 1, कोऱ्हाळे 3, कोळकी 3, मुळीकवाडी 1,  मलवडी 1, बिबी 1,  शिंदेवाडी 1, फडतरवाडी 3, सरडे 1, सासकल 1, सावंतवाडी 2, सुरवडी 3, उपळवे 1, चांभारवाडी 2, तावडी 2, आरडगाव 2, आदर्की बु 2,  शिरवळ ता खंडाळा 1, आंधळी ता माण 1 रुग्ण बाधित सापडले आहेत

No comments