Breaking News

फलटण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते उद्या रुग्णवाहिकांचे वितरण

Distribution of ambulances to primary health centers in Phaltan taluka by Shrimant Ramraje tomorrow

  फलटण दि. १६ : सातारा जिल्हा परिषदेने १४ व्या वित्त आयोग निधीतून खरेदी केलेल्या ३१ रुग्णवाहिकांपैकी ६ रुग्णवाहिका फलटण तालुक्यातील सर्व ६ प्रा. आरोग्य केंद्रांना उद्या शनिवार दि. १७ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालयात विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक वितरित करण्यात येणार आहेत.

     फलटण तालुक्यातील तरडगाव, साखरवाडी, बिबी, राजाळे, बरड आणि गिरवी या सर्व ६ प्रा. आरोग्य केंद्रांकडे सुमो रुग्णवाहिका वापरात आहेत, मात्र त्यांची मर्यादा संपल्याने त्या वापरायोग्य राहिल्या नसल्याने नवीन रुग्णवाहिकांची मागणी वाढत असताना आता टेम्पो ट्रायव्हलर या पूर्वी पेक्षा अधिक दर्जेदार आणि प्रशस्त रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने फलटण तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक गतिमान होईल असा विश्वास वैद्यकीय अधिकारी व नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

No comments