Breaking News

ज्युनियर नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत फलटणच्या देविका घोरपडे ला सुवर्ण

Devika Ghorpade wins gold at Junior National Boxing Championships

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)   ज्युनियर नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशीप २०२१ या स्पर्धेत फलटणच्या कु. देविका सत्यजीत घोरपडे (गजेंद्रगडकर) हिने सुवर्णपदक मिळवले आहे. या विजेतेपदामुळे कु. देविकाची १६ ऑगस्ट २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२१ रोजी दुबई येथे होणाऱ्या ज्युनियर आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात (५० किलो वजनी गटात) निवड झाली आहे.

    सोनिपत, हरियाणा येथे २६ जुलै २०२१ ते ३१ जुलै २०२१ रोजी झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या फलटणच्या कु. देविका सत्यजीत घोरपडे हिने  ओरिसा, दिल्ली, पंजाब हरियाणा  या राज्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज विजय मिळविले.

No comments