Breaking News

फलटणमध्ये 11 तर जिल्ह्यात 41 बाधितांचा मृत्यू ; सातारा जिल्ह्यात 861 कोरोनाबाधित


Corona virus Satara District updates :  41 died and 861 corona positive

    सातारा दि.30 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  861 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 41 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.सातारा जिल्ह्यात 41 बधितांचा  मृत्यू झाला आहे , सर्वात जास्त संख्या  फलटण तालुक्यात आहे.  येथे 11 बधितांचा मृत्यू झाला आहे. 

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

    जावली 24 (9331), कराड 152 (34650), खंडाळा 58  (13061), खटाव 127 (21574), कोरेगांव 84 (18970), माण 78 (14723), महाबळेश्वर 3 (4503) पाटण 18 (9553), फलटण 115 (30775), सातारा 149 (45118), वाई 42 (14272) व इतर 11 (1637) असे आज अखेर एकूण 218167 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

    तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 2(199), कराड 9 (1030), खंडाळा 0 (163), खटाव 5(515), कोरेगांव 2 (407), माण 2 (300), महाबळेश्वर 0 (86), पाटण 3 (331), फलटण 11 (527), सातारा 2 (1325), वाई 4 (325) व इतर 1 (73), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5281 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

No comments