Breaking News

झिरपवाडी येथे 2 बलिकांवर बलात्कार ; लिंगपीसाट धनंजय गायकवाड पोलिसांच्या ताब्यात

Rape of 2 girls at Zirapwadi; Lingpisat Dhananjay Gaikwad in police custody

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 30 जुलै 2021   - झिरपवाडी येथील लिंगपिसाट धनंजय बाजीराव गायकवाड याने दोन अल्पवयीन मुलींना भेळ खाण्याचे आमिष दाखवून, त्यांच्यावर  बलात्कार केला. संबंधितावर आयपीसी व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी तातडीने हालचाल करत आरोपीस अटक केले आहे. 

    फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, झिरपवाडी येथील धनंजय बाजीराव गायकवाड याने दिनांक 26 जुलै 2021 रोजी दुपारी 2.00 ते 2.15 वाजण्याच्या सुमारास,   1) पिडीत बालिका  वय 7 वर्ष 9 महिने 2) पिडीत बालिका वय 4 वर्ष दोन्ही रा. झिरपवाडी ता. फलटण जि. सातारा या दोन मुलींना, तुम्हाला भेळ खायला देतो असे म्हणून, त्याच्या राहते घरात झिरपवाडी तालुका फलटण येथे नेऊन त्या दोन्ही अल्पवयीन आहेत हे माहित असताना, आरोपी धनंजय गायकवाड याने दोन्ही मुलींची कपडे काढून, त्यांच्यावर आळीपाळीने बलात्कार केला आहे. व सदर घटनेबाबत कोणाला काही सांगायचे नाही असा दम दिला आहे. 

  अधिक तपास  पोलिस निरीक्षक  भारत किंद्रे  व सह तपासी अधिकारी म्हणून  परि. महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे हे करीत आहे.

No comments