Breaking News

फलटण तालुक्यात 62 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus Phaltan updates :  62 corona positive

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 21 जुलै 2021  - आज दि. 21 जुलै 2021 रोजी  जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 62 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये शहरात 3  व्यक्ती तर ग्रामीण भागात 59 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक ढवळ व शिंदेवाडी  येथे प्रत्येकी 5 रुग्ण सापडले आहेत.  

    आज दि. 21 जुलै  2021 रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 62 बाधित आहेत. 62 बाधित चाचण्यांमध्ये 16 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 46 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 3 तर ग्रामीण भागात 59 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात ढवळ 5, शिंदेवाडी 5,  कोळकी 4, मिरढे 2, निंबळक 1, रावडी खु 1, सरडे 1, चौधरवाडी 2, तरडगाव 2, दुधेबावी 1, सोमंथळी 2,  खडकी 1, खुंटे 1, बरड 1,  कांबळेश्वर 1, मिरगाव 1, तिरकवाडी 2, पाडेगाव 1, सुरवडी 2, वाखरी 1, तरडफ 1, आळजापुर 1, आरडगाव 1, साखरवाडी 1, कुरवली खु 1, ठाकुरकी 1, अलगुडेवाडी 1, विडणी 2, शिरवली ता बारामती 1, आंधळी ता माण 1, गाडेवाडी ता माण 10, धामणी ता माण 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments