भाऊ - भावजय कडून दुसऱ्या भावास दगडाने मारहाण
Beaten by one brother to another
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - एक भाऊ ट्रॅक्टरने शेतात फणपाळी करीत असताना, दुसरा भाऊ व भावजय तेथे आले, व माझ्या शेतातील माती तुझ्या शेतात दाबुन का नेली असे म्हणुन दगडाने मारहाण केल्या प्रकरणी उपळवे येथील पती-पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कोण मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 30 जून 2021 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मौजे उपळवे तालुका फलटण गावच्या हद्दीत अशोक विठोबा लंभाते हे जमीन गट नं ६४६ मध्ये इनाम नावचे शिवारात ट्रॅक्टरने फणपाळी करीत असताना, फणपाळी करुन झालेवर अशोक लंभाते यांचा भाऊ भानुदास लंभाते हा तेथे आला व म्हणाला की, तु मोकळ्या दोन सा-यातुन आमच्या रानातील माती, तुझ्या रानात दाबुन का नेली, असे म्हणुन तेथील पडलेला दगड हातात धरुन अशोक लंभाते याच्या डोक्यात मारला, त्यावेळी अशोक हे तेथेच खाली पडले व त्यांच्या डोक्यातुन रक्त येवु लागले, त्यावेळी भावजय सुरेखा लंभाते हिने देखील दगड हातात धरुन अशोक याच्या उजव्या गुडघ्यावर मारुन शिवीगाळ दमदाटी केली असल्याची फिर्याद अशोक विठोबा लंभाते रा.उपळवे यांनी दिली आहे.
अधिक तपास पोलिस हवालदार एस. बी. राऊत करीत आहे.
No comments