Breaking News

कॅन्सरशी लढा देणाऱ्या गोखळी येथील आदित्यला हवा मदतीचा हात

Aditya Jagtap is battling cancer, needs help

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील अवघ्या १३ वर्षाच्या नववी मध्ये शिकत असलेल्या आदित्य मुकेश जगताप हा "हाॅजकिन या लिफोमा" या अतिशय दुर्धर अशा कॅन्सरच्या आजाराशी लढत असुन, त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. आदित्यवर पुणे येथील भारती हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरू असुन, हाॅस्पिटल, मेडिकल व इतर तपासणी खर्च सोडून उपचारासाठी चार लाख रूपये खर्च हाॅस्पिटलकडून सांगण्यात आले आहेत. दर पंधरा दिवसांतून एकदा त्याच्यावर किमोथेरपीची ट्रीटमेट सुरू असुन, त्यासाठी प्रत्येक वेळी सहा हजार पाचशे इतका खर्च सध्या सुरू आहे.आदित्यचे वडील मजूरी करतात. घरची परस्थिती सामान्य असल्याने आर्थिक खर्चाचा डोंगर पेलणे अशक्य आहे. तरी  समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थानी आर्थिक मदतीचा हात पुढे करण्याची विनंती जगताप कुटुंबियांनी केली आहे.
आर्थिक मदत पुढील पत्यावर पाठवावी -
आर.टी.जी.एस.,चेक, डिमांड ड्राफ्ट व्दारे बॅंक खात्यात जमा करावी.
खातेदाराचे नाव -  शिवकन्या मुकेश जगताप
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा - गोखळी ता. फलटण जि. सातारा
खाते क्रमांक - १०२७००६००५७७६
आय.एफ. एस.सी.कोड - IBKL0485SDC

No comments