सलग ३ दिवस रक्तदान शिबीर, मोठ्या संख्येने रक्तदात्यांचा प्रतिसाद ही प्रेरणादायी बाब - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण (प्रतिनिधी) -रक्तवीर संघटनेच्या पुढाकाराने सलग ३ दिवस रक्तदान शिबीराचे आयोजन करुन रक्तदानामध्ये समाजातील विविध घटकांना सामावून घेत केलेले प्रयत्न प्रेरणादायी आणि समाजहिताला प्राधान्य देणारे असल्यानेच या शिबीराद्वारे सुमारे ७०० बाटल्या रक्तदान झाल्याचे सांगून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी संयोजकांना धन्यवाद दिले.
आर्ट ऑफ लिव्हिंग, दै सकाळ, संभाजी ब्रिगेड, सद्गुरु प्रतिष्ठान, रक्त वीर संघटना यांच्या संयुक्त सहभागाने येथील महाराजा मंगल कार्यालयात दि. २७, २८, २९ जून रोजी आयोजित भव्य रक्तदान शिबीर समारोप प्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, म. एज्युकेशन सोसायटीचे सर्वेसर्वा कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले, ऋषिकेश बिचुकले, भाऊसाहेब कापसे वगैरे उपस्थित होते.
सलग ३ दिवस सुरु असलेल्या रक्तदान महोत्सवात ६७१ रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधीलकी जपली. या महोत्सवात रेड प्लस ब्लड बँक पुणे, पंढरपूर ब्लड बँक, पंढरपूर, फलटण मेडिकल फौंडेशन संचलित ब्लड बँक फलटण या रक्त पेढ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट सहकार्य केले.
शहर तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, विविध सामाजिक संघटना, स्थानिक सर्व पत्रकार, व्यापारी असोसिएशन यांच्यासह तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिकांचे बहुमोल सहकार्य लाभले.
शिबीर आयोजन, नियोजन करण्यासाठी ऋषिकेश बिचुकले, दीपक मोहिते, ज्ञानेश्वर घाडगे, विशाल शिंदे, अमर चोरमले, आशिष काटे, सनी निकम, नितीन शेवते, विनीत शिंदे, सुरत चोरमले, सूनील अब्दगिरे यांच्यासह विविध संस्थांच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.
प्रत्येक रक्तदात्याला हेल्मेट, बनियन, सॅनिटायझर बॉटल आणि चहा नाश्ता देवून सन्मानित करण्यात आले.

No comments