Breaking News

अहद सामाजिक विकास संस्थेमार्फत 235 लोकांनी केले रक्तदान - मेहबूबभाई मेटकरी

रक्तदान शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी दीप प्रज्वलन करताना मेहबूबभाई मेटकरी

    235 people donated blood through Ahad Samajik Vikas Sanstha - Mehboobbhai Metkari

    फलटण (प्रतिनिधी) - अहद सामाजिक विकास संस्थेमार्फत आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले गेले असून, नुकतेच लोकमतच्या रक्तदान शिबिरामध्ये  संस्थेच्या वतीने 235 लोकांनी रक्तदान करून, आपली सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याची माहिती अहद सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष मेहबूबभाई मेटकरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

    गेली 5 वर्ष या संस्थेच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव, गणराया वार्ड, तसेच गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप, मुलांना खाऊचे वाटप, तसेच कोरोना कालावधीमध्ये परप्रांतीयांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी केलेली मदत असेल त्याचबरोबर थोर राष्ट्रपुरुष यांच्या जयंती, पुण्यतिथीच्या च्या माध्यमातून लोकांच्या मध्ये चांगले विचार रुजविणे व चांगले संस्कार घडविणे अशा अनेक कार्यक्रमासह कोरोना कालावधीमध्ये जवळपास 500 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले असल्याचे मेहबूबभाई शेख यांनी कळवले आहे. 

No comments