ओबीसी आरक्षण मुद्द्यावर सरकारला उघडे पाडल्यामुळे 12 आमदार निलंबित - देवेंद्र फडणवीस
गंधवार्ता वृत्तसेवा दि 5 जुलै- भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत असल्याची घोषणा केली आणि सभात्याग केला. त्यानंतर विधानसभेबाहेर मीडियाशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ओबीसी आरक्षण मुद्द्यावर आम्ही सरकारला उघडे पाडल्यामुळे खोटे आरोप लावून सरकारने भाजपाचे 12 आमदार निलंबित केले असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लावला.
केवळ या सरकार मुळे ओबीसींचे आरक्षण गेलं हे आम्ही दाखवून दिल्यामुळे सरकारने आमच्या 12 आमदारांवर खोटे आरोप लावून, निलंबित केले आहे. ओबीसीं आरक्षण करता 12 च काय पूर्ण 106 आमदारांना निलंबित केले तरीही आम्ही संघर्ष करतच राहू, एक वर्ष नाही पाचही वर्ष आमचे या ठिकाणी सदस्यपद रद्द झाले तरीही आम्ही संघर्ष करू. जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भाजप संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
No comments