Breaking News

भाजपचे 12 आमदार एका वर्षासाठी निलंबित

12 BJP MLAs suspended for one year

    गंधवार्ता वृत्तसेवा दि 5 जुलै- आज महाराष्ट्र विधानसभेच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी,  एमपीएससी परीक्षेसाठी समिती स्थापन करणे, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या मुद्दय़ावरून भाजपच्या काही आमदारांनी महाविकास आघाडी सरकार सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सभागृहात प्रवेश केल्यावरही भाजपच्या आमदारांची घोषणाबाजी सुरूच होती आणि   विधानसभेचे अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासमोर सत्ताधारी पक्षाचे काही आमदार एकमेकांवर भिडले. हे प्रकरण इतके वाढले की मार्शलला घटनास्थळी बोलावले गेले. या आमदारांनी विधानसभेच्या सभापतींसोबत धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. भास्कर जाधव यांनी सदर घटनेबद्दल सभागृहात नाराजी व्यक्त केली आणि संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्याचा ठराव मांडला. हा ठराव बहुमताने मंजूर झाला आणि भाजपच्या 12 आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले.

    भाजपच्या आ. पराग अलवानी, आ. राम सतपुते,आ. संजय कुटे,आ.आशीष शेलार, आ.अभिमन्यू पवार, आ.गिरीश महाजन, आ.अतुल भातखळकर, आ.शिरीष पिंगळे, आ.जयकुमार रावल,आ. योगेश सागर, आ. नारायण कुचे आणि आ. किर्तीकुमार भंगडिया या 12 यांना निलंबित करण्यात आले.

No comments