Breaking News

फिर्याद नोंदवत असताना दोघांनी केली पोलिसाला धक्काबुक्की

While filing the complaint, the two assault the police

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण, दि. ५ जून - महिलेची तिच्या दीराच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवत असताना, पहिलीच्या महिलेच्या पती व दीर यांनी पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी साखरवाडी येथील दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ जून २०२१ रोजी दुपारी १२:१५ वाजण्याच्या सुमारास सहायक पोलीस फौजदार विलास ज्ञानदेव यादव आणि पोलीस उपनिरीक्षक शेख पो.कॉ खरात व होमगार्ड  पिसाळ, तरडे असे साखरवाडी पोलीस चौकीमध्ये हजर असताना, तक्रारदार महिला सुस्मिता विजयकुमार गायकवाड रा.कामगार कॉलनी साखरवाडी ता.फलटण या त्यांच्या दीराचे विरुद्ध तक्रार देत असताना, तिचा पती विजयकुमार लक्ष्मण गायकवाड व तिचा दीर जयकुमार लक्ष्मण गायकवाड दोन्ही रा. कामगार कॉलनी साखरवाडी यांनी सहायक पोलीस फौजदार विलास यादव हे साखरवाडी पोलीस दुरक्षेत्र मध्ये तक्रार घेत असताना, यादव यांच्या हातातील मोनटॅक्स कंपनीचा निळ्या रिपिलचा पेन हिसकावून घेवुन, त्यांच्याशी हुज्जत घालून, शिवीगाळ दमदाटी करून,  सहा. पोलीस फौजदार विलास यादव करीत असलेले सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याची फिर्याद सहायक पोलीस फौजदार विलास ज्ञानदेव यादव यांनी दिली आहे. त्यानुसार 1) विजयकुमार लक्ष्मण गायकवाड 2) जयकुमार लक्ष्मण गायकवाड दोन्ही रा. कामगार कॉलनी साखरवाडी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

No comments