खामगाव येथे सोन्याचे दागिने व रोख रक्कमेसह 9 लाख 30 हजारांची चोरी
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. १८ जून २०२१ - घराचा कडीकोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून घरातील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकूण 9 लाख 30 हजार रुपये 310 रुपये किंमतीचा ऐवज खामगाव तालुका फलटण येथून अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १६ जून २०२१ रोजीचे रात्री ९.०० ते दिनांक १७ जून २०२१ रोजीचे पहाटे ५:३० वाजण्याच्या दरम्यान शोभा माणिक पवार वय ५६ वर्षे रा.५ सर्कल खामगाव ता. फलटण यांची मुलगी अश्वीनी शिंदे रा. खामगाव हिच्या मालकीच्या घराच्या दरवाजाची कडी कोयंडा अज्ञात चोरट्याने कशाने तरी तोडुन, घरात प्रवेश करुन घरातील लोखंडी राजा राणी कपाटातील व त्या कपाटा शेजारील लोखंडी कपाटातील ९,०५,३१० /- किंमतीचे सोन्याचे दागिने व २५,०००/- रोख रक्कम असे एकूण ९ लाख ३० हजार ३१० रुपये किंमतीचा ऐवज समंतीशिवाय मुददाम लबाडीने चोरुन नेला असल्याची फिर्याद शोभा माणिक पवार यांनी दिली आहे.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

No comments