Breaking News

फलटण तालुक्यातील २ मुख्य रस्त्यांसाठी सुमारे १० कोटी मजूर

About 10 crore laborers for 2 main roads in Phaltan taluka

     गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. १८ जून २०२१ -: केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांनी फलटण तालुक्यातील २ रस्त्यांच्या कामासाठी ९ कोटी ८६ लाख  ६५ हजार रुपये मंजूर करण्यात आल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.

       फलटण - कुरवली - मांडवखडक - दालवडी - उपळवे - वेळोशी - कुलकजाई या राज्य महामार्ग क्रमांक ६७ पैकी सीतामाई घाट रस्त्याच्या कि. मी. २२-४०० ते २२-६०० या ४ कि. मी. रस्त्यासाठी ५ कोटी ९२ लाख ६५ हजार रुपये आणि फलटण - आसू - तावशी या जिल्हा सरहद्द राज्य महामार्ग क्रमांक ७ पैकी २८ कि. मी. अंतरातील कामासाठी ३ कोटी ९४ लाख रुपये असे फलटण तालुक्यातील २ रस्त्यांसाठी एकूण ९ कोटी ८६ लाख ६५ हजार रुपये मंजूर केल्याचे महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि आ. दीपकराव चव्हाण यांना दोन स्वतंत्र पत्राद्वारे कळविले.

No comments