Breaking News

अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Rape of a minor girl; Filed an offense under Pokso

    गंधवार्ता वृत्तसेवा, फलटणदि. १ जून २०२१ - राजुरी येथील अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने ९ महिन्यांपूर्वी आमिष दाखवून तिच्याबरोबर जबरदस्तीने  शरीरसंबंध  ठेवल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध आयपीसी व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस पोलिसांनी अटक केलेली आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, माहे सप्टेंबर २०२ महिन्यामध्ये राजुरी तालुका फलटण येथील अल्पवयीन मुलगी  हीला - कोणीतरी अज्ञात इसमाने मागील ९ महिन्यापुर्वी अज्ञात ठिकाणी नेऊन कशाचे तरी अमिष दाखवुन, ती साधारणतः १७ वर्षाची अल्पवयीन असताना, तिच्या बरोबर जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. त्यामध्ये ती गरोदर राहिली.  तिची दिनांक १४/५/२०२१ रोजी मातृछाया नर्सिंग होम वारजे माळवाडी पुणे शहर येथे प्रसुती झाली असल्याची फिर्याद पुणे शहर पोलीस स्टेशन येथे देण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास होणे कामी सदरची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडे वर्ग करण्यात आली असून, सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करीत आहेत.

     सदर तपासामध्ये आरोपी निषन्न झाल्याने त्यास गुन्हयाचे कामी अटक करणेत आलेली आहे.

No comments