Breaking News

विकास कामात निभोंरे ग्रामपंचायत कुठेही कमी पडणार नाही - उपसरपंच मुकुंदराव रणवरे

Nibhonre Gram Panchayat will not fall short in development work - Mukundrao Ranavare
    निभोंरे (प्रतिनिधी) -  निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निंभोरे यांनी विकासकामांचा झंझावात सुरू केला आहे. विकास कामात निभोंरे ग्रामपंचायत  कुठेही कमी पडणार नाही. वेळ प्रसंगी निधी कमी पडला तर स्वखर्चाने कामे करण्यात येत आहेत असे उपसरपंच मुकुंदराव रणवरे (काका) यांनी सांगितले.
      निभोंरे (बांदलवस्ती) येथील नागरिकांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेत असतावेळी ग्रामस्थांची आपुलकीने विचारपुस करून कोरोना विषयी जनजागृती करताना उपसरपंच मुकुंदराव रणवरे बोलत होते. यावेळी सरपंच मा.सौ.कांचनताई निंबाळकर,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मदने, युवा ग्रामपंचायत सदस्य सनी मदने,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष अभिजित निंबाळकर, तालुकाउपाध्यक्ष निरंजन पिसाळ, कुंडलिक माडकर, करीम शेख, पांडुरंग माने, स्वप्निल अडसूळ, हरीभाऊ भिसे, महेश जमदाडे उपस्थित होते.

    यावेळी निंभोरे गावचे युवा ग्रामपंचायत सदस्य सनी मदने यांनी गणपती मंदीर येथील पेव्हर ब्लाॅक, सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी आवश्यक असणाऱ्या सिमेंट पाईप, विद्युत खांबावरील बल्ब इ. प्रश्न  निदर्शनास आणून दिले व त्या समस्या सोडवण्याचे आश्वासन व तत्परता उपसरपंच मुकुंदराव रणवरे (काका) यांनी दाखवली व संबंधित अधिकारी,कर्मचारी यांच्याशी चर्चा देखील केली. 

No comments