नाईक निंबाळकर राजघराण्याच्या श्वान ताफ्यात इंडियन मॅस्टीफ दाखल
Indian Mastiff in Phaltan's royal dog sqwad
भारतिय श्वानाला पुन्हा एकदा जागतिक वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार - श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर
Will try to bring Indian dogs world glory once again - Shrimant Raghunathraje Naik Nimbalkar
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण, दि. २० जून - नाईक निंबाळकर राजघराण्यातील श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी अस्सल भारतिय, चॅम्पियन ब्लडलाईनचे "चार्ली वेस्टमिनिस्टर" इंडियन मॅस्टीफ हे श्वान सांगवी येथील 'विक्रम विलास पॅलेस' येथे आणले आहे.
ब्रिटिश 'द केनेल क्लब' मान्यताप्राप्त 'वेस्टमिनिस्टर केनेल इंडिया'चे फलटण येथे इंडियन मॅस्टीफ डॉगवर सुरू असलेले शास्त्रीय संशोधन व प्रजनन प्रक्रियेचे श्रीमंत रघुनाथराजे यांनी कौतुक करीत, आगामी काळात या भारतिय श्वानाला पुन्हा एकदा जागतिक वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
सन १८६१ साली महाराजा ऑफ फलटण श्रीमंत मुधोजीराव नाईक निंबाळकर यांनी राजवड्यामध्ये इंडियन मॅस्टीफ प्रजातीचा डॉग पाळला होता. पुढे त्याच्या स्मरणार्थ फलटण शहरात मोती चौक निर्माण करण्यात आला असल्याचेही श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
ब्राऊन रंगाच्या, सुपर अलर्ट 'चार्ली' चा 'वेस्टमिनिस्टर केनेल इंडिया' येथे जन्म झाला असून, येणाऱ्या वर्षभरात त्याची उंची ३२ इंच, वजन ७० किलो, आणि डोक्याचा परीघ 28 इंचा परियांत वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जबड्याची ७४८ पीएसआय ताकत असणारा इंडियन मॅस्टीफ डॉग बिबट्या, लांडगा यांसारख्या हिंस्र प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी परिचित आहे.
सन १८६४ साली लंडन येथे भरलेल्या पहिल्या जागतिक श्वान प्रदर्शनामध्ये ब्रिटिश राजघराण्याच्या केनेल मधील इंडियन मॅस्टीफ डॉग विजेता ठरला होता. जगज्जेता अलेक्जांडरने पंजाबमधून ५०० इंडियन मॅस्टीफ सोबत नेले असल्याचे वर्णन अॅरिसटॉटल या महान इतिहासकाराने वर्णिले आहे.

No comments