बँकांची वेळासाठी सुधारित आदेश जारी - जिल्हाधिकारी शेखर सिंह
Issue revised orders for Banks time - Collector Shekhar Singh
सकाळी 11 ते 2 या वेळात फक्त अत्यावश्यक सेवेतील क्षेत्रासाठी बँका सुरु राहतील
सातारा दि. 1 (जिमाका): कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयात जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार दि .31 मे च्या आदेशानुसार दिनांक 8 जून पर्यंत सुधारित आदेश जारी केले आहेत. या आदेशात पुढील प्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे. “ सहकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU व खाजगी बँका व सहकारी बँका यांच्याशी संबंधित फक्त शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अनुषंगाने पीक कर्जाचे, खते, बी-बियाणे, शेती औजारे यांची दुकाने, गॅस एजन्सीज, पेट्रोल पंप, मेडीकल यांचे रोख व्यवहार इ. कामकाज, एटीएम मध्ये पैसे भरणे, चेक क्लिअरन्स, डाटा सेंट ही कामे कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत चालू राहील. तसेच या बँकांचे उर्वरित सर्व कामकाज पूर्णपणे बंद राहील. या ठिकाणी गर्दी होणार नाही. तसेच कारोनाचे अनुषंगाने सोशल डिस्टन्सींगचे काटेकोरपणे पालन केले जाईल. याची जबाबदारी संबंधित बँक व्यवस्थापक यांची राहील. ”

No comments