Breaking News

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्लँटचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Inauguration of Oxygen Production Plant at Krantisinha Nana Patil General Hospital by the Guardian Minister

    सातारा (जिमाका):  स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्लँटचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी ऑक्सिजन प्लँट उभे करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीकडून ऑक्सिजन निर्मितीची माहिती घेतली.

    या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर दराडे, उपअभियंता राहूल अहिरे आदी उपस्थित होते.

कोरोना रुग्णांना ऑक्सिजन प्लँटमुळे मिळणार दिलासा

    कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवडा जाणवला. केंद्र शासनाच्या योजनेतून स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात ऑक्सिजन प्लँट बसविण्यात आला आहे. या प्लँटमधून तयार होणारा ऑक्सिजन हा रुग्णालयापर्यंत पोहविण्याची व्यवस्था करण्यात आली, यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.

 नाममात्र किंमतीत 19 जनरेटर

    स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयासह 19 ठिकाणी ऑक्सिजन निर्मितीचे प्लँट उभे करण्यात आले आहे.  या प्लँटचा विद्युत पुरवठा खंडीत होवू नये म्हणून कुपर कार्पोरेशन प्रा.लि. व कमिन्स कपंनी यांनी नाममात्र किंमतीत 19 जनरेटर दिले आहेत. ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पांमुळे ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले.

No comments