Breaking News

फलटणच्या राजधानी टॉवरमधील बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण प्रकरणी न्यायालयात दाद मागणार - अशोक जाधव

Rajdhani tower illegal construction and encroachment case will appeal to the court - Ashok Jadhav

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 28 जून 2021 - फलटण नगर पालिकेकडून नव्याने बांधण्यात आलेल्या राजधानी टॉवरमधील बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमणाला नगर विकास खात्याकडून देण्यात आलेल्या स्थगिती आदेशाच्या विरोधात  न्यायालयात दाद मागणार असल्याचे नगरसेवक अशोक जाधव यांनी जाहीर केले आहे.

    फलटण नगर पालिकेकडून नव्याने बांधण्यात आलेल्या राजधानी टॉवरमधील बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण बाबत आंदोलनाची नोटीस विरोधी नगरसेवकांनी दिली होती. याप्रकरणी  दिनांक 23 जून रोजी सहाय्यक संचालक, नगररचना, सातारा यांनी सदरच्या बेकायदा बांधकामाबाबत स्थगिती आदेश दिले. परंतु सत्ताधाऱ्यांनी मात्र फलटण परिषदेने बांधलेल्या इमारतीचे बेकायदेशीर काम व अतिक्रमण वाचवण्यासाठी नगर विकास मंत्रालयाकडून स्थगिती आदेश आणून, फलटण शहरातील जनतेवर अन्याय केला आहे.   फलटण नगरपरिषदेने सर्वसामान्य नागरिकांची अतिक्रमणे अमानुषपणे पाडून त्यांना रस्त्यावर आणले होते. मात्र नगरपरिषदेने बांधलेल्या बेकायदा बेकायदेशीर काम व अतिक्रमण वाचविण्यासाठी विधान परिषदेचे सभापती यांचा प्रयत्न चालू आहे.
    नगर विकास खात्याने दिलेल्या स्थगिती आदेशाविरोधात ताबडतोब न्यायालयात दाद मागणार आहोत, व या प्रकरणात, 'दूध का दूध - पानी का पानी' करून दाखवल्या शिवाय स्वस्त बसणार नाही, यामध्ये मुख्याधिकारी, नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी, नगर रचना सातारा यासह नगर विकास खाते या सर्वांना पार्टी करून न्यायालयात न्याय मागणार असल्याचे नगरसेवक अशोक जाधव यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.

No comments