Breaking News

पाडेगाव येथे नियमबाह्य लसीकरण ; सत्ताधारी आपल्या मर्जीतील लोकांना फ्रन्टलाइन वर्कर दाखवून लस देत आहेत - भाजप किसन मोर्चा

Illegal vaccination at Padegaon - - BJP Kisan Morcha

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २३ जून - पाडेगाव येथे नियमबाह्य रित्या कोरोना लसीकरण होत आहे. सत्ताधारी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आपल्या मर्जीतील लोकांना फ्रन्टलाइन वर्कर दाखवून लस देत असल्याची तक्रार भाजप किसान मोर्चा पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन येऊन केली आहे.

    फलटण तालुका भारतीय जनता पक्षाच्या  किसान मोर्चाचे वतीने, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे , शहराध्यक्ष अमोल सस्ते , किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शंकरराव दडस, भटके विमुक्त जमाती सेलचे तालुकाध्यक्ष सुनील जाधव या शिष्टमंडळाने फलटण उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांना पाडेगाव येथे नियमबाह्य रित्या होत असलेल्या लसीकरणाच्या बाबत निवेदन देण्यात आले.

    दिलेल्या निवेदनामध्ये, पाडेगाव येथे पाच ते सहा वेळा लसीकरण झाले आहे परंतु शासकीय नियमाप्रमाणे या ठिकाणी लसीकरण होताना  दिसत नाही, सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला लसीपासून वंचित ठेवले जात आहे व सत्ताधारी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आपल्याच मर्जीतील लोकांना फ्रन्टलाइन वर्कर दाखवून लस देत आहेत, तसेच ज्यांना कोवीड होऊन गेला आहे अशाही लोकांना लस दिली जात आहे, तसेच दोन लसी मधील आंतर दुसऱ्याचा मोबाईल नंबर टाकून कमी केले जाते व परत त्याच व्यक्तींना लस दिली जाते, त्यामुळे सामान्य लोकांना लस उपलब्ध होत नाही. ज्या दिवशी लस  मिळणार आहे, त्या दिवशी लोक सकाळपासून नंबर लावुन बसतात,  परंतु त्यांना लस मिळत नाही तरी, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व डॉक्टरांनी यामध्ये राजकारण करू नये. याबाबत आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा व सर्व सामान्य लोकांना लस उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागास सूचना कराव्यात अन्यथा आम्हाला याबाबत आंदोलन उभे करावे लागेल अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

No comments