Breaking News

कोविडमुळे दोन्ही पालक गमवलेल्या बालकांची माहिती 1098 या हेल्पलाईन द्यावी

The helpline 1098 should be informed about the children who have lost both their parents due to Covid

   सातारा   (जिमाका): कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी अशा बालकांबाबतची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सातारा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, सातारा दूरध्वनी क्रमांक 02162-237353 यावर तसेच बाल कल्याण समिती सातारा चाईल्ड हेल्प लाईन 1098 वर देण्यात यावी,  असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केले आहे.

      जिल्हा बाल संरक्षण , सातारा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, सातारा यांच्या दूरध्वनी क्रमांक 02162-237353 व चाईल्ड हेल्प लाईन 1098 वर 11 कॉल्स आले असून त्यामध्ये सर्व बालकांचे वडील कोविड-19 मुळे मृत्यु पावलेले आहेत. त्या सर्व बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्याबाबत बाल कल्याण समिती, सातारा यांना शिफारस करण्यात आलेली असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी कळविले आहे.

No comments