राज्यातील बिघाडी सरकार सर्व स्तरावर अपयशी - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर ; ओबीसी आरक्षणासाठी फलटण येथे चक्काजाम आंदोलन
फलटण (प्रतिनिधी) - राज्यातील आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यात कुचराई केली, तसेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण अबाधित राखण्यातही ते यशस्वी ठरले नाहीत, ही दोन्ही आरक्षण कसे जातील यापद्धतीचा कारभार या बिघाडी सरकार कडून करण्यात आला. त्यामुळे राज्यात आलेले हे बिघाडी सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे, मात्र भाजपा सरकारने ही दोन्ही आरक्षणे टिकवली होती. तथा ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात यावे यासाठी राष्ट्रीय काँग्रेस ने आपले लोक न्यायालयात पाठवून ओबीसींना अडचणीत आणले अशा सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही असे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. ते आज भाजपच्या वतीने ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे यासाठी चक्का जाम आंदोलनात सहभागी झाले असता फलटण येथे बोलत होते.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टात व्यवस्थित व वस्तुनिष्ठ बाजू मांडण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरले, या मुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण कोर्टात टिकवू शकले नाहीत, तर ठाकरे सरकार मध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या काही नेत्यांनी व त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी कोर्टात धाव घेतली व ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द केले,या मुळे ठाकरे सरकारने आत्तापर्यंतच्या कालावधीत एकाही समजाला न्याय मिळवून दिला नाही, असे खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
शनिवार दिनांक 26 रोजी सकाळी 10 वाजता भारतीय जनता पक्षाच्या वतीने व खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाजाचे चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले होते, या मध्ये जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे,अशोकराव जाधव,तसेच इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
No comments