Breaking News

सातारा जिल्ह्यातील 1 हजार 497 ग्रामपंचायत क्षेत्रातील व्याधिग्रस्त व्यक्तींचा झाला सर्व्हे ; 1 हजार 936 व्याधिग्रस्त आढळले योग्य वेळी उपचार सुरु

A survey of 1,497 diseased persons in Satara district was conducted; 1 thousand 936 patients were found to start treatment at the right time

    सातारा (जिमाका) 30:- सातारा जिल्ह्यातील 1 हजार 497 ग्रामपंचायतींमध्ये आशा, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत दररोज केल्या जाणाऱ्या कोमॉर्बिड सर्व्हेक्षणांतर्गत कोविड-19 लक्षणे सदृष्य लक्षणे असलेली 1 हजार 936 रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली आहे.

    सातारा जिल्ह्यात आशा व अंगणवाडी ताई सेविका यांच्या माध्यमातून दररोज 25 ते 40 व्याधीग्रस्त नागरिकांचा सर्वे केला जात असून यामध्ये विविध लक्षण असणारे नागरिक व 94 पेक्षा कमी ऑक्सीजन असणाऱ्या नागरिकांना शोधून त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत तात्काळ कोविड टेस्ट केली जात आहे,

    मागील आठवड्यात झालेल्या सर्वेनुसार सातारा तालुक्यातील 195 ग्रामपंचायतींमधील 7 हजार 38 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यापैकी 299 नागरिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.  कोरेगाव तालुक्यातील 142 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 294 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यापैकी 211 नागरिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.  खटाव तालुक्यातील 134 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 911 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यापैकी 394 नागरिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.  माण  तालुक्यातील 95 ग्रामपंचायतींमधील 3 हजार 118 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यापैकी 300  नागरिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.  फलटण  तालुक्यातील 131 ग्रामपंचायतींमधील 5 हजार 860 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यापैकी 132 नागरिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.  खंडाळा  तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींमधील 150 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यापैकी 17 नागरिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.  वाई तालुक्यातील 99 ग्रामपंचायतींमधील 3 हजार 72  नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यापैकी 54 नागरिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.  जावली तालुक्यातील 125  ग्रामपंचायतींमधील 4 हजार 193 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यापैकी 100 नागरिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.  महाबळेश्वर तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींमधील 905 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यापैकी 19  नागरिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.  कराड तालुक्यातील 200  ग्रामपंचायतींमधील 4 हजार 933 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यापैकी 323 नागरिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.  पाटण तालुक्यातील 234 ग्रामपंचायतींमधील 393 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यापैकी 87 नागरिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.  या सर्व्हेमुळे लवकर निदान झाले, त्या सर्वांवर योग्य वेळी उपचार सुरु झाले

No comments