खा. रणजीतसिह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश : ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी करण्यास जिल्हा परिषदेची ग्रामपंचायतींना अनुमती
Success of Ranjit Singh Naik Nimbalkar's Efforts: Zilla Parishad Allows Gram Panchayats to Purchase Oxygen Concentrator Machine
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. ११ मे २०२१ - बहुतांश ठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत विलगिकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत, मात्र रुग्णास ऑक्सिजनची गरज भासल्यास रुग्णांना देता येत नाही, त्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदीस जिल्हा परिषदेने, ग्रामपंचायतींना मान्यता दयावी, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्राद्वारे केली होती. त्यास सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सहमती दर्शवीत तसे निर्देश जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱयांना दिले असल्याचे भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी सांगितले.
जिल्हास्तरावरुन १५ व्या वित्त आयोग निधी वापराबाबत प्राथमिकता बदलास विलंब होऊ शकतो, त्यासाठी याबाबत सर्वाधिकार गटविकास अधिकारी यांना देवून, तातडीने निर्णय घ्यावेत व तशा पद्धतीचे प्रस्ताव ग्रामपंचायतीकडे मागून घेऊन त्यास परवानगी द्यावी असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या संबंधीच्या आदेशात स्पष्ट केले आहे, सदरची मशीन गव्हर्मेट ई मार्केट प्लस या साइटवरुन खरेदी करता येणार आहेत.
आपल्या पत्राची जिल्हा परिषदेने तातडीने दाखल घेतल्याबद्दल व तातडीने कारवाई केल्याबद्दल खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार मानले आहेत.

No comments