Breaking News

झिरपवाडी येथे जुगार अड्ड्यावर रेड ; 7 जणांवर गुन्हा दाखल

Raid on gambling den at Zirapwadi; Crimes filed against 7 persons

    गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण 4 मे 2021 - जिल्हाधिकारी सातारा यांनी दिलेल्या जमावबंदीचे आदेशाचे उलंघन करुन, स्वतः मास्काचा वापर न करता हयगीयने बेदरकारपणे मानवी जिवित व व्यक्तीगत सुरक्षा धोकयात येईल असे कृत्य करुन, एकत्र येवुन  तिन पानी पत्याचा जुगार खेळताना झिरपवाडी  ता. फलटण येथे 7 जण मिळुन आले. फलटण शहर पोलिसांनी  यांच्यावर कारवाई करून संबधीत 7 जणांवर गुन्हा दाखल करून 2 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, 1) चंद्रकांत भीमराव जाडकर राहणार निरगुडी तालुका फलटण 2)निलेश लक्ष्मण कदम राहणार गिरवी तालुका फलटण 3) नितीन मोहन गायकवाड राहणार तरडगाव तालुका फलटण  4) माऊली भिवरकर राहणार धुळदेव ता.फलटण 5) विशाल पवार राहणार सोमवार पेठ, फलटण 6) सचिन गुंजवटे राहणार झिरपवाडी ता.फलटण 7) कुणाल लालासो भंडलकर राहणार उमाजी नाईक चौक फलटण हे सर्वजण दिनांक 03 मे 2021 रोजी सायंकाळी 6.20 वाजता चे सुमारास झिरपवाडी ता. फलटण गावचा हद्दीत निळकंठ पेट्रोल पंपाचे पाठीमागील मोकळ्या पत्र्याचे शेड मध्ये तोंडाला मास्क न लावता एकत्र बसून,  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने इतरांचे जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली कृती करून,  जिल्हाधिकारी सो सातारा यांच्या आदेशाचा भंग केल्याने व बेकायदेशीर स्वतःच्या फायद्याकरता तीन पानी पत्त्यावर जुगार खेळत असताना मिळून आले. घटनास्थळावरून  2,61,750/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात रोख रक्कम 28150/-, तीन अँड्रॉइड मोबाईल 50 हजार रुपये किमतीचे व इतर 1, 83,690 असे  जुगारासाठी लागणारे साहित्य  मिळून आले.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सातारा अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहरचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे,  सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन राउळ , पो हवा 2142 पिसे, 420 लावंड, शरद तांबे पो ना 393,पो शि 1037 सतिष दडस  ,चालक पो ना 1272 मदने, पो शि 2535 साबळे यांनी केलेली आहे.

            सदर गुन्ह्याचा तपास  पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप येळे हे करीत आहेत.

No comments