Breaking News

निर्बंध काळात अनावश्यक घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलिस विभागाने कारवाई करावी - गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई

The police department should take action against those who move out of the house unnecessarily during the restricted period  - Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai

    सातारा (जिमाका): शासनाने कडक निर्बंध लावूनही काही नागरिक अनावश्यकपणे घराबाहेर फिरत आहेत, अशा नागरिकांवर पोलीस विभागाने कारवाई करावी, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज केल्या.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतचा आढावा गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

    जिल्ह्यातील विविध नाक्यांवर पोलीस विभागामार्फत तपासणी केली जाते, या तपासणी कामास नगर परिषदांनी मदत करावी, अशा सूचना करुन गृह राज्यमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, जे नागरिक अनावश्यकपणे रस्त्यांवर फिरत आहेत अशांवर कारवाई करा. तसेच कडक निर्बंध असूनही काही ठिकाणी गर्दी दिसत आहे ही गर्दी कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.

No comments