ICMR पोर्टल अपडेट करण्याचे काम सुरू असल्याने गोंधळ ; फलटण कोरोना बधितांची संख्या 147 - शिवाजीराव जगताप
Confusion as work continues to update the ICMR portal; Number of Phaltan Corona victims 147 - Shivajirao Jagtap
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण, दि. 27 मे 2021 - फलटण तालुक्याची कालची कोरोना covid-19 बधितांची संख्या ही 147 असल्याचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी सोशल मीडियाद्वारे जाहीर केले आहे. दरम्यान फलटण तालुक्याची कोरोना बधितांची संख्या 1071 असल्याचे जाहीर झाल्यानंतर सर्वत्र गोंधळ उडाला होता, या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी कालचा कोरोना बधितांची संख्या जाहीर केली.
सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या हि आटोक्यात आलेली आहे. मात्र मागील चाचण्या ICMR पोर्टलवर अपडेट करण्याचे काम प्रलंबीत होते. ते सध्या सुरु असल्याने पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या १०७१ अशी दाखवली जात आहे. मात्र कालची प्रत्यक्ष पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींची संख्या १४७ आहे असे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी कळविले आहे.
No comments