Breaking News

पंढरपूरची जबाबदारी खासदार रणजितसिंह यांनी समर्थपणे पेलली - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

खा. रंजीतसिंह यांना पेढा भरवून त्यांचे अभिनंदन करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
MP Ranjit Singh took over the responsibility of Pandharpur - Leader of Opposition Devendra Fadnavis

    गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. १० मे २०२१ - पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीची दिलेली जबाबदारी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी  समर्थपणे पेलत, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांना निवडून आणले आहे, या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असून या कामाची  पक्ष दखल घेईल  असा विश्वास  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी  व्यक्त करून,  माढा मतदार संघातील 35 गावाच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात लवकरच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे केल्या.
आ. समाधान आवताडे यांचे अभिनंदन करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 
    मुंबई येथे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांचे शाल व श्रीफळ देऊन  विधानसभेचे विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले. तसेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुक विजयाचे शिल्पकार माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी पेढा भरवून अभिनंदन केले.  यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी मंत्री बाळा भाऊ भेगडे, विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार  जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार राम सातपुते ,सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख, किसान मोर्चाचे कोषाध्यक्ष शशिकांत  देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी माढा मतदार संघातील 35 गावाच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात लवकरच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांना केल्या, त्याचप्रमाणे पंढरपूर भागात वाढत असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव विषयी चिंता व्यक्त केली. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना केल्या.

No comments