गोरगरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नकार्यासाठी महाराजा मंगल कार्यालय पूर्णतः मोफत - दिलीपसिंह भोसले
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. १० मे २०२१ - कोव्हीड लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील गोरगरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नकार्यासाठी सद्गुरु उद्योग समूह फलटण व महाराजा मंगल कार्यालय फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने महाराजा मंगल कार्यालय पूर्णतः मोफत देणार असल्याचे सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले यांनी जाहीर केले आहे.
कोरोना काळात सर्वसामान्य जनतेचे जीवन असह्य झाले आहे. यातच घरात एखादे लग्नकार्य निघाले तर आर्थिक अडचणीमुळे ते शक्य होत नाहीये. अशी सर्वत्र परिस्थिती असतानाच, सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांना मदतीचा एक हात म्हणून, सद्गुरु उद्योग समूह व महाराजा मंगल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने, लक्ष्मीनगर फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय हे पूर्णतः मोफत देण्याचा निर्णय सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले यांनी घेतला व तो जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
महाराजा मंगल कार्यालय हे फलटण शहर व तालुक्यातील जनतेसाठी मोफत राहणार आहे. इथे लग्नकार्य समारंभ होत असताना, राज्य शासनाने कोव्हीड 19 अनुषंगाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. अधिक माहितीसाठी 9423880240 या क्रमांकाशी संपर्क साधावा.

No comments