Breaking News

कै.माजी खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर कोविड DCHC सेंटरचे उद्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा यांच्या हस्ते उद्घाटन

Late former MP Hinduraoji Naik Nimbalkar Kovid DCHC Center inaugurated by BJP State President Chandrakantdada tomorrow

    गंधवार्ता, वृत्तसेवा, दि. ११ मे २०२१ -  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने फलटण येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने कै. हिंदुरावजी नाईक निंबाळकर कोविड उपचार केंद्राचे उद्या दि. १२ मे २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. 

    या कोविड उपचार केंद्रात ५० ऑक्सीजन बेड सह बाधित रुग्णांसाठी ५० बेड असे एकूण १०० बेड तयार करण्यात आले आहेत. फलटण परिसरामध्ये रुग्णाची   मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने, फलटणमधील आरोग्य सुविधा कमी पडायला लागली म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन उत्कर्ष लॉज, रविवार पेठ येथे आधुनिक पद्धतीचे व सर्व सोयींनी युक्त असे यंत्रणा उभी करुन, कोविड सेंटर उभे केले आहे. त्यासाठी लागणारा खर्च स्वतः त्यांनी केलेला आहे. शासनाच्या वतीने सर्व वैद्यकीय अधिकारी  इतर पॅरामेडिकल स्टाफ, लागणारे औषधे, ऑक्सिजन हे शासन पुरवणार आहे. तसेच  रुग्णांच्या चहा पाणी व जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. या प्रसंगी  प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, नगर परिषद विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर,  फलटणचे प्रांत अधिकारी शिवाजी जगताप साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव उपस्थित राहणार आहेत.  भारतीय जनता पक्षाचे सर्व आघाडी, मोर्चाचे, अध्यक्ष पदाधिकारी, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, सरपंच व  कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती फलटण शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमोल सस्ते यांनी दिली आहे.

No comments