8 दुकाने, 5 विनामस्क व 27 विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई
गंधवार्ता, वृत्तसेवा, दि. ११ मे २०२१ - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक सातारा यांनी दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर शहरात बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या वर फलटण शहर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली यामध्ये जवळपास 27 वाहनांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले. व त्यांची वाहने 8 दिवसांकरता ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 8 दुकानदारांवर करवाई करण्यात आलेला आहे. आणि विना मास्क फिरणाऱ्या 5 नागरिकांवर कारवाई करण्यात आली.
आज दिनांक ११ मे २०२१ रोजी फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीतील प्रमुख चौकातून नाकाबंदी पॉईंट नेमुन, विनाकारण दोन चाकी/चार चाकी मध्ये फिरणाऱ्या नागरिकांची चौकशी करून वाहन डिटेन करण्याची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमे दरम्यान 27 वाहने तात्पुरत्या कालावधी करता डिटेन करण्यात आली आहेत.
तसेच संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 8 दुकानदारांवर करवाई करून 11,000/- रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. तसेच विना मास्क फिरणाऱ्या 5 नागरिकांवर कारवाई करून 1,000/- रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई करता फलटण शहर पोलीस ठाणे कडील 4 अधिकारी,20 पोलीस अंमलदार,15 होमगार्ड नेमण्यात आले होते.तरी फलटण शहर पोलीस ठाण्याचे वतीने सर्व नागरिकांना,दुकानदारांना आवाहन करण्यात येते की, फलटण शहरामध्ये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विनाकारण कोणीही बाहेर पडू नये व प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.

No comments