फलटण तालुक्यात 111 तर सातारा जिल्ह्यात 2528 कोरोनाबाधित तर 30 बाधितांचा मृत्यू
फलटण -: फलटण तालुक्याची कालची कोरोना covid-19 बधितांची संख्या ही 111 असल्याचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी संगितले आहे. दरम्यान जिल्हा प्राशासनाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्याची कोरोना बधितांची संख्या 1253 आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे विचारणा केली असता, कालचा कोरोना बधितांची संख्या 111 असल्याचे समजते.
जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2528 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 30 बाधितांचा मृत्यु झाला तर फलटण तालुक्यात 1253 रुग्ण कोरोना बाधित सापडले असून आज फलटण तालुक्यात 1 बधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 50 (7314), कराड 172 (21709), खंडाळा 95 (10112), खटाव 167 (15075), कोरेगांव 146 (13787),माण 159 (10912), महाबळेश्वर 39 (3965), पाटण 67 (6502), फलटण 1253 (24311), सातारा 308 (34498), वाई 59 (11356 ) व इतर 13 (1013) असे आज अखेर एकूण 160554 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0(164), कराड 5 (626), खंडाळा 0 (131), खटाव 2 (404), कोरेगांव 2 (309), माण 4 (205), महाबळेश्वर 1(43), पाटण 1 (156), फलटण 1(245), सातारा 13 (1010), वाई 1 (299) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3592 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
No comments