Breaking News

फलटण शहरासह तालुक्यातील 8 गावांमध्ये 15 मे पर्यंत कंटेन्टमेंट झोन जाहीर

Containment zones declared in 8 villages of the taluka including Phaltan till 15th May

    गंधवार्ता, वृत्तसेवा, फलटण दि. 8 मे 2021 -  फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण फलटण शहर व फलटण तालुक्यातील कोळकी, फरांदवाडी, विडणी, साखरवाडी, वाखरी, वाठार निंबाळकर, तरडगाव, जाधववाडी या 8 गावात दिनांक 9 मे 2021 ते 15 मे 2021 पर्यत उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी कंटेन्टमेंट झोन जाहीर केला असल्याचे आदेश दिले असून प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये केवळ आरोग्य विषयक सुविधा म्हणजेच दवाखाने, मेडिकल सुरु राहतील. इतर अत्यावश्यक सेवा जसे की दुध, भाजीपाला, किराणा अशा सेवा बंद राहतील, या आवश्यक सेवा केवळ घरपोहोच सुरु राहणार आहेत.

     फलटण शहर हददीमध्ये दिनांक 04/05/2021 ते 07/05/2021 या कालावधीमधील कोरोना विषाणूची चाचणी करणेकामी घेतलेल्या अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींची संख्या 193 आली आहे, त्यामुळे  फलटण शहरामधील कोव्हिड-19 रुग्ण आढळलेल्या व्यक्तींची संख्या व परिसर पाहता पुर्ण फलटण शहरच प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करणे आवश्यक आहे. तसेच कोरोना विषाणुच्या प्रसाराचे माध्यम पाहता सदर विषाणुची लागण एका संक्रमित रुग्णाकडुन अन्य व्यक्तीस / इसमास / समुदायाचे त्यांच्या संपर्कात आल्याने होतो. त्यासाठी त्या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. त्यामुळे  पुर्ण फलटण शहर परिसर हा दि. 09/05/2021 ते 15/05/2021 या कालावधीसाठी प्रतिबंधीत क्षेत्र (Containment Zone) म्हणून उपविभागीय दंडाधिकारी तथा INCIDENT COMMANDER फलटण शिवाजीराव जगताप यांनी घोषित केले आहे.

    त्याचबरोबर फलटण तालुक्यातील कोळकी, फरांदवाडी, विडणी, साखरवाडी, वाखरी, वाठार निंबाळकर, तरडगाव, जाधववाडी या 8 गावांमधील कोव्हिड 19 रुग्ण आढळलेल्या व्यक्तींची संख्या व परिसर पाहता सदर गावातील ग्रामपंचायत क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करणे आवश्यक आहे. त्यामुळे वरील ग्रामपंचायत हद्दीतील संपूर्ण परिसर हा दि. 09/05/2021 ते 15/05/2021 या कालावधीसाठी प्रतिबंधीत क्षेत्र (Containment Zone) म्हणून उपविभागीय दंडाधिकारी तथा INCIDENT COMMANDER फलटण शिवाजीराव जगताप यांनी घोषित केले आहे.

    प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये केवळ आरोग्य विषयक सुविधा म्हणजेच दवाखाने, मेडिकल सुरु राहतील. 2) इतर अत्यावश्यक सेवा जसे की दुध, भाजीपाला, किराणा अशा सेवा बंद राहतील, या आवश्यक सेवा केवळ घरपोहोच सुरु राहणार आहेत.

No comments