Breaking News

15 व्या वित्त आयोगाच्या अबंधीत निधीतून ग्रामपंचायत क्षेत्रात विलगिकरण कक्ष स्थापन करण्यास मान्यता

 

Approval to set up a Separation cell in the Gram Panchayat area from the funds of the 15th Finance Commission

    सातारा   (जिमाका) : कोरोनाच्या आपत्तीजनक परिस्थितीसाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी ग्रामविकास विभागामार्फत एखाद्या ग्रामपंचायतीने कोविड झालेलया रुग्णांसाठी ग्रामपंचायत क्षेत्रात 30 किंवा त्यापेक्षा जास्त खाटांचे विलगिकरण कक्षाची मागणी केल्यास, अशा उभारण्यात येणाऱ्या विलगीकरण कक्षास 15 व्या वित्त आयोगाच्या अबंधीत (United) प्राप्त निधीच्या 25 टक्केच्या मर्यादेत खर्च करण्यास 25 मे रोजीच्या परिपत्रकान्वये शासन मान्यता देण्यात आली आहे.

  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी ग्रामपंचायतीमध्ये विलगीकरण कक्ष उभारणीबाबत योग्य ते नियोजन करुन  संबंधित ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगाच्या अबंधीत निधीमधून खर्च करण्यास मान्यता देण्यात येण्याबाबतही या परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे.

No comments